विधानसभा निवडणूक 2024

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी यादी जाहीर; कुणाला मिळणार संधी?

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी यादी जाहीर झाली आहे. 15 उमेदवारांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. याच्या आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची पहिली यादी जाहीर झाली होती मात्र पहिल्या यादीत बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

15 उमेदवारांचा शिवसेना ठाकरे गटाच्या दुसरे यादी समावेश

1) धुळे शहर- अनिल गोटे

2)चोपडा (अज)- राजू तडवी

3) जळगाव शहर- जयश्री सुनील महाजन,

4) बुलढाणा- जयश्री शेळके,

5) दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल

6) हिंगोली- रूपाली राजेश पाटील

7) परतूर- आसाराम बोराडे

8) देवळाली (अजा) योगेश घोलप

9)कल्याण पश्चिम- सचिन बासरे

10 )कल्याण पूर्व - धनंजय बोडारे

11) वडाळा श्रद्धा श्रीधर जाधव

12 )शिवडी- अजय चौधरी

13) भायखळा- मनोज जामसुतकर

14)श्रीगोंदा- अनुराधा राजेंद्र नागावडे

15)कणकवली- संदेश भास्कर पारकर.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी