विधानसभा निवडणूक 2024

'अजित पवारांवर कसला अन्याय? मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शरद पवार काय म्हणाले?

शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचे संकेत दिले आहेत. मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन करताना त्यांनी महाविकास आघाडीला बहुमत मिळण्याची शक्यता व्यक्त केली.

Published by : shweta walge

महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणुकीच मतदान पार पडत आहे. यावेळी शरद पवार यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर शरद पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचे संकेत दिले आहेत. तसच ते अजित पवारांवर देखील बरसले.

शरद पवार म्हणाले की, मी काही ज्योतिषी नाही. पण एकूण चित्र असं दिसतंय की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल. इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे.

महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या हातात आहे. प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 67 टक्के मतदान झाले होते. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये त्यावेळी मतदानाची टक्केवारी 75 ते 80 टक्के इतकी होती. महाराष्ट्राने मतदानाच्या टक्केवारीत मागे राहणे, हे अशोभनीय आहे. म्हणून माझं आवाहन आहे, मतदानाचा हक्क हा कोणत्याही परिस्थितीत बजावला पाहिजे. तुम्हाला जो राजकीय पक्ष आणि व्यक्ती योग्य वाटेल, त्यांना मतदान करा. पण मतदान जरुर करा, असे शरद पवार यांनी सांगितले.

पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या सांगता सभेचा संदर्भ सांगत या सभेमध्ये आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र वाचून दाखवण्यात आले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाला असा उल्लेख करण्यात आला होता. त्याविषयी विचारले असता, शरद पवार म्हणाले, ''यांना अनेक वर्षे सत्ता मिळाली. चारवेळा उपमुख्यमंत्री मिळाले. अनेक वर्ष मंत्रिपद मिळाले. त्यांच्यावर कसला अन्याय झाला..? युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी'', असंही पवार म्हणाले.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या हल्लाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात साधारणत: साधारणत महाराष्ट्रात शांततेत मतदान होते. पण नागपूर जिल्ह्यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख हल्ला झाला, तो अस्वस्थ करणारा होता. महाराष्ट्रात दरवेळी तुरळक प्रकार वगळता शांततेत मतदान पार पडते. पण यंदा तसे घडताना दिसत नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.

Latest Marathi News Updates live: मतदानात महिलांची टक्केवारी वाढली

CBSE Board Exam 2025: विद्यार्थ्यांनो तयारीला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

Herbal Tea During Pregnancy: गरोदरपणातील हर्बल चहा ठरेल बाळ आणि बाळंतीणीच्या आरोग्यासाठी वरदान

Latest Marathi News Updates live: मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मविआ नेत्यांची बैठक

शरीरातील नैसर्गिक वेग म्हणजे काय? जाणून घ्या वेगाचे 13 प्रकार