काहींच्या डोक्यात सत्ता फार लवकर गेली, परळीमधून शरद पवारांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. तर काही लोकांच्या संकटाच्या काळात मदत केली. पक्ष फोडण्यात तीन प्रमुख लोक पवारांच्या या वक्तव्यामुळे पवारांचा निशाणा नेमका कोणावर या संदर्भातल्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
यापार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले की, काही लोकांना त्यांच्या राजकीय संकटाच्या वेळी मदतीची आवश्यकता होती. त्यावेळेला माझ्याकडून त्यांना मदत केली गेली. सत्ता आल्यावर पाय जमिनीवर ठेवावे लागतात, सत्ता डोक्यात जाऊन द्यायची नसते. या लोकांना सत्ता दिली पण त्यांच्या डोक्यामध्ये सत्ता फार लवकरच गेली.