महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. सत्ताधारी आणि विरोधकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपकडून सातत्यानं 'वोट जिहाद'चा मुद्दा उपस्थित केला जात आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मुद्दा पहिल्यांदा निवडणुकीच्या प्रचारात आणला. पण आता भाजपच्या या मुद्द्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यासाठी त्यांनी पुण्यातील मतदानाचा संदर्भ दिला आहे.
पण शरद पवारांनी या वोट जिहादच्या मुद्द्यावर भाष्य करताना विशिष्ट समाज जर विशिष्ट राजकीय पक्षाला मतदान करत असेल तर त्याला जिहाद वैगरे समजण्याचं कारण नाही. कारण एक विशिष्ट समाज जो बहुसंख्येनं फक्त भाजपलाच मतदान करतो, त्याला आम्ही वोट जिहाद समजत नाही, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
"पुण्याच्या काही भागात एक विशिष्ट समाज आहे. जो हिंदू समाज आहे, त्यांनी भाजपला मतदान केलं तर त्याची आम्हाला सवय आहे. कारण आम्हाला माहिती आहे इथं असंच मतदान होतं. याचा अर्थ आम्ही त्याला जिहाद समजत नाही. वोट जिहाद हा शब्द वापरुन विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक प्रकारचा धार्मिक रंग या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो" अशा शब्दांत शरद पवारांनी फडणवीसांसह भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
थोडक्यात
पुण्याच्या काही भागात विशिष्ट समाज भाजपला मत देतो.
मात्र आम्ही त्यास जिहाद समजत नाही.
वोट जिहाद हा शब्द वापरुन विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला.
शरद पवारांचं फडणवीसांसह भाजपला जोरदार प्रत्युत्तर
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: