विधानसभा निवडणूक 2024

Sharad Pawar NCP: 9 उमेदवारांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून या यादीची घोषणा करण्यात आलेली आहे.

Published by : Team Lokshahi

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरु झाली आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून या यादीची घोषणा करण्यात आलेली आहे. या यादीत नऊ उमेदवारांचा समावेश असून यात मुंबईच्या अणुशक्तीनगरमधून अभिनेत्री स्वरा भास्करचे पती फहाद झिरार अहमद यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील 9 उमेदवारांची नावे

मोहोळ सिद्धी- रमेश कदम

परळी- राजेसाहेब श्रीकिसनराव देशमुख

माजलगाव - मोहन बाजीराव जगताप

भोसरी -अजित दामोदर गव्हाणे

चिंचवड- राहुल तानाजी कलाटे

हिंगणा -रमेशचंद्र गोपीकीशन बंग

हिंगणघाट- अतुल नामदेव वांदिले

कारंजा - ज्ञायक राजेंद्र पटणी

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी