महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, ही निवडणूक महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान या संदर्भात अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रावर जे अतिक्रमण, आक्रमण झालेलं आहे व्यापार मंडळाकडून त्याविरोधात ही निवडणूक आम्ही लढतो आहे. कधी नव्हे इतका पैशांचा पाऊस या निवडणुकीत पडतो आहे. ठिकठिकाणी फक्त पैसै, पैसे, पैसे. नक्कीच पैशांचा वापर याआधी झाला असेल.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, या राज्याला संस्कृती आहे. मराठी माणसाची संस्कृती आहे. या राज्याला एक विचार आहे, या राज्याला एक भूमिका आहे. ती संपूर्ण मोडून व्यापाऱ्यांच्या हाती देण्यासाठी ही निवडणूक काही लोक लढत आहेत. मराठी माणसाने सावध राहावं आणि मतदान करावं. असे संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: