विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी महाराष्ट्रात 36 तारखेला सत्तेवर येत आहे. 23 ला निकाल लागतील. 26 ला सरकार स्थापन करु. 23 तारखेलाच संध्याकाळपर्यंत आम्ही सत्तास्थापनेचा दावा करु शकतो.
महाविकास आघाडीला 160 ते 165 जागा आमच्या एकत्रित निवडून येत आहेत. त्याच्यामुळे या एक्झिट पोलवर कुणीही विश्वास ठेऊ नये. आतापर्यंत कोणते एक्झिट पोल खरे ठरले. हा एक संशोधनाचा विषय आहे. सत्तेच्या चाव्या येत आहेत की फक्त कुलूप येत आहे हे आता 72 तासांनी ठरेल ना. प्रचंड पैसे त्यांनी वाटलेलं आहेत. पैशांचा पाऊस पाडलेला आहे. यंत्रणांचा गैरवापर केला आहे. तरीसुद्धा ही निवडणूक ही पैशापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान, महाराष्ट्र धर्म. या विषयी लढली गेलेली निवडणूक आहे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आम्हाला खात्री आहे की या राज्याच्या जनतेनं पैशाच्या प्रवाहात वाहून न जाता महाराष्ट्रासाठी मतदान केलं. आमचं स्पष्ट मत होते. महाराष्ट्र हवाय की अदानी राष्ट्र हवाय. तुम्हाला 23 तारखेला मी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण सांगेन ? असे संजय राऊत म्हणाले.