विधानसभा निवडणूक 2024

Sanjay Raut : काही अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून उद्या निकाल लागणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून उद्या मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

यातच निवडून येण्याची शक्यता असणाऱ्या अपक्ष उमेदवारांना संपर्क केला जात असल्याची देखील माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी महाराष्ट्रात 160 जागा जिंकणार. आम्ही 26 तारखेला सरकार बसवणार आहे. सरकार अधिक मजबूत करायचं असेल जिथे सत्ता असते तिथे अपक्ष येतात किंवा लहान पक्ष येतात.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, आमच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे आमदार येतील, समाजवादी पार्टीचे आमदार येतील. काही अपक्ष आमदारांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केलेली आहे. असे संजय राऊत म्हणाले.

NEWS PLANET With Vishal Patil | 'लाडकी बहीण' ठरणार गेमचेंजर? लाडक्या बहिणींची कुणाला साथ?

Nilesh Rane | Kokan Vidhansabha | कोकणात कुणाचं वारं? निलेश राणे Exclusive

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?

मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

'त्या' प्रकरणी अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स