अमित ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. माझ्या उमेदवारीनंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला अस अमित ठाकरे यांनी म्हटलं आहे. माझ्या काकांना वाटल आपण कसे मागे राहिलो म्हणून त्यांनी पण त्यांचा उमेदवार जाहीर केला. अमित ठाकरे म्हणाले होते की, मला वाटतं लिस्ट जाहीर झाल्या नंतर 3 तासात पहिला शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला.
त्याच्या नंतर माझ्या काकांना वाईट वाटल की मी कसा मागे राहिलो एखाद दोन दिवसात त्यांचा पण उमेदवार जाहीर झाला. तो उमेदवार जाहीर झाल्यावर पहिला फोन मी संदीप देशपांडे यांना केला, कारण मी बातम्या ऐकायला लागलो होतो. की कुठे तरी वरळीमधून माघार घेतली तर आम्ही माहिमधून माघार घेऊ हे फक्त बातम्यांमध्ये येत होत. त्यावेळेस मी संदीप देशपांडेंना म्हणालो की, माघार घ्यायची नाही.
आपण उतरलो आहे ते जिंकण्यासाठी आणि जिंकायचं अमित ठाकरेंनी केलेल्या या टीकेवर संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अमित ठाकरे वयाने लहान शांतपणे निवडणूक लढवावी, तरुण कार्यकर्ता म्हणून आम्ही अमित ठाकरेंना शुभेच्छा देतो असं संजय राऊत म्हणाले आहेत.