विधानसभा निवडणूक 2024

Sandeep Naik Resigned: नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी; संदीप नाईक यांचा भाजपला रामराम

नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी होणार आहे. संदीप नाईक यांचा भाजपला रामराम पाहायला मिळतो आहे.

Published by : Team Lokshahi

नवी मुंबई भाजपमध्ये बंडखोरी होणार आहे. संदीप नाईक यांचा भाजपला रामराम पाहायला मिळतो आहे. भारतीय जनता पार्टी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा त्यांनी राजीनामा दिला आहे आणि आता ते शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे संदीप नाईक आता वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत आहेत. ते शरद पवार राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत ते आता शरद पवार राष्ट्रवादीमधून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती आहे.

संदीप नाईक राजीनामा देत म्हणाले की,

महोदय,

मी भारतीय जनता पार्टी, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असताना या कार्यकाळात जिल्हा, मंडल कार्यकारणी, मोर्चा, प्रकोष्ठ, सेल इत्यादी संघटनात्मक रचना गठीत करुन कार्यान्वित करण्याचे कार्य केले. तसेच शक्तीकेंद्र, सुपर वॉरियर्स, बुथ रचनाही पूर्ण करुन सक्रीय केल्या. वेळोवेळी पक्षाचे विविध कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन करुन संघटना व बुथच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहचण्याचे कार्य केले आहे.

आपण माझ्यावर दाखविलेला विश्वास व दिलेल्या संधीबद्दल आपली कृतज्ञता व्यक्त करतो व आपणांस कळवू इच्छितो की, मी माझ्या वैयक्तिक कारणास्तव, भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदांचा तसेच भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा आज राजीनामा देत आहे. त्याचा स्विकार व्हावा,

ही विनंती. धन्यवाद !

संदीप गणेश नाईक

Diwali 2024: दिवाळीच्या सजावटीचा विचार करताय! मग "या" टिप्स नक्की फॉलो करा...

कल्याण पूर्वच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये मिठाचा खडा, नाराज पदाधिकारी Eknath Shinde यांच्या भेटीला

Ajit Pawar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या ' त्या' वक्तव्यावरून अजित पवारांचा टोला | Marathi News

Waqf Board Bill: वक्फ विधेयकाच्या जेपीसी बैठकीत राडा! भाजप अन् तृणमूल काँग्रेसचे खासदार भिडले

ठाकरे आणि थोरांतामध्ये जागावाटपाबाबत अडीच तास चर्चा, चर्चेत काय घडलं?