विधानसभा निवडणूक 2024

Sana Malik: नवाब मलिकांच्या कन्या निवडणुकीच्या रिंगणात, "या" दिवशी करणार उमेदवारी अर्ज दाखल...

विधानसभा निवडणूक पुढच्या महिन्यावर आली आहे. यावर अनेक पक्षांनी आपल्या हालचालींना सुरुवात केली आहे. बैठकी तसेच अनेक चर्चांना उधान येताना दिसत आहे.

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणूक पुढच्या महिन्यावर आली आहे. यावर अनेक पक्षांनी आपल्या हालचालींना सुरुवात केली आहे. बैठकी तसेच अनेक चर्चांना उधान येताना दिसत आहे. अशातच सना मलिक उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सना मलिक अणुशक्ती नगरमधून रिंगणात उतरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती उपाध्यक्षा आणि प्रदेश प्रवक्त्या सना मलिक शेख या अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून २३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असून या मतदारसंघाचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी नेतृत्व केले आहे. मतदारसंघावर मजबूत पकड असलेल्या नवाब मलिक यांनी हा मतदारसंघ मुलगी सना मलिक हिच्यासाठी सोडला आहे. वडिलांनी बांधलेला हा अभेद्य गड पुन्हा एकदा मजबूत करण्यासाठी सना मलिक या गेली पाच वर्षे काम करत असल्याचे समजते.

Waqf Board Bill: वक्फ विधेयकाच्या जेपीसी बैठकीत राडा! भाजप अन् तृणमूल काँग्रेसचे खासदार भिडले

Diwali 2024: दिवाळीच्या सजावटीचा विचार करताय! मग "या" टिप्स नक्की फॉलो करा...

कल्याण पूर्वच्या जागेवरुन शिवसेना-भाजपमध्ये मिठाचा खडा, नाराज पदाधिकारी Eknath Shinde यांच्या भेटीला

Ajit Pawar On Rohit Pawar | रोहित पवारांच्या ' त्या' वक्तव्यावरून अजित पवारांचा टोला | Marathi News

ठाकरे आणि थोरांतामध्ये जागावाटपाबाबत अडीच तास चर्चा, चर्चेत काय घडलं?