विधानसभा निवडणूक 2024

समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार; 'या' तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक बैठका होत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

महेश महाले, नाशिक

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले असून अनेक बैठका होत आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. समीर भुजबळ नांदगाव विधानसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. 28 ऑक्टोबरला समीर भुजबळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून गणेश धात्रक यांना मिळाली उमेदवारी आहे तर शिवसेनेकडून सुहास कांदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदगाव विधानसभा मतदार संघात आता तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

नरहरी झिरवळ यांचं शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले...

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून रोहित पवार यांच्या 'या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?

दिवाळीत उटणे लावण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?