सदा सरवणकरांची ट्विट करत राज ठाकरेंना विनंती
राज ठाकरेंनी मला पाठिंबा द्यावा- सरवणकर
माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर अन्याय करु नका- सरवणकर
बाळासाहेब असते, तर नातलगासाठी सीट सोडायला सांगितलं नसतं- सरवणकर
मी 40 वर्ष मेहनत घेतोय, कष्टाने 3 वेळा आमदार झालो- सरवणकर
संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेला, शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा माहिम मतदारसंघावरून आता चांगलेच राजकीय नाट्य रंगल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांना माहिम मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेने भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे भाजपला मनसेने दिलेल्या पाठिंब्याची परतफेड करायची आहे. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वीच आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजपने मनसेला पाठिंबा दर्शिवला आहे. त्यामुळे आता सदा सरवणकर यांनीच राज ठाकरे यांच्याकडे विनवणी करणारी भावनिक साद घातली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांची सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरील पोस्ट