निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यात भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचा धुरळा उडणार असल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, योगी आदित्यनाथ यांच्या सभा होणार असून भाजपकडून 100हून अधिक सभांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी यांच्या पश्चिम महाराष्ट्र, मुंबई-कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अशा 8 सभांचे नियोजन करण्यात आले आहे तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ही 15 सभा होणार असल्याची माहिती मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी - 8
अमित शाह - 20
नितीन गडकरी - 40
देवेंद्र फडणवीस - 50
चंद्रशेखर बावनकुळे - 40
योगी आदित्यनाथ - 15