सध्या राजकीय वर्तूळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहे. लोकसभेला जे चित्र राजकीयवर्तूळात पाहायला मिळत होत तेच चित्र आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदलेलं दिसत आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार अशी घोषणा केली. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. तर याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नात्यांमध्ये देखील बदलाव पाहायला मिळाले आहेत. अनेक राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत.
याचपार्श्वभूमीवर रोहित पवारांनी त्यांच्या भंडारा जिल्ह्यातील एका सभेत प्रफुल्ल पटेलांवर निशाणा साधला आहे. विकास करायला बिरोधकांसोबत गेलात मग जिल्ह्यात भेल कंपनी का सुरू केली नाही? रोहित पवार यांचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका. यावेळी रोहित पवार म्हणाले की, भाईजीनी सांगितलं होतं काही तरी एक कंपनी आणतो कंपनी आणली नाही. साहेबांनी तुमच्यावर प्रेम केलं विश्वास टाकला आणि तुम्ही साहेबांना सोडलं.
भंडारा गोंदियाच्या जनतेला तुम्ही सांगितलं, मी चाललो विकासाला, विकासाला तुम्ही गेलात त्यावेळेस तुम्ही भेल कंपनी आणणार होता का नाही आणली मग? असा प्रश्न देखील रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांना केला आहे. तुम्ही मोदी साहेबाना भेटता ईडी संदर्भात बोलता मग भेल संदर्भात का बोलत नाही असा टोला रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना लगावला आहे.