संजय देसाई, सांगली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पाटील म्हणाले की, लोकशाहीमध्ये मतदानाचा दिवस हा पवित्र दिवस आहे. या पवित्र दिवशी प्रत्येकाने आपलं मतदान करत लोकशाहीमध्ये आपलं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन मी महाराष्ट्रातील आणि तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना करतो.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, दहशत नाही आहे, कुठल्याही पद्धतीची गुंडगिरी नाही आहे. गुंडगिरी मोडून काढण्याचे काम या मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांनी केलेलं आहे. आता लोक मतदानासाठी बाहेर पडलेलं आहेत ते गुंडगिरीच्याविरोधात, दडपशाहीच्याविरोधात पडलेलं आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसं यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. राज्यामध्ये महाविकास आघाडीसाठी पोषक असं वातावरण आहे. सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे. असे रोहित पाटील म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: