दौंडचे माजी आमदार रमेश थोरात सुप्रिया सुळेंच्या भेटीला बारामतीत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे रमेश थोरात आता हाती तुतारी घेणार यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. बारामतीत शरद पवार यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर सुप्रिया सुळेंसोबत भेट घेतली जाणार आहे. मात्र यापार्श्वभूमीवर पक्षप्रवेश सोहळा कधी होणार हे पाहण आता महत्त्वाचं ठरणार आहे.
यापार्श्वभूमीवर रमेस थोरात म्हणाले की, गावा गावात आणि वस्तीवर जाऊन बैठका घेतलेल्या आहेत आणि तिथे सगळ्यांचा सुर एकच आहे. एक तर पहिली तुतारी यावी, तुतारीचं चिन्ह पहिलं मिळालं तर त्याला पहिलं प्रधान्य देण्यात याव. जर तुतारी दिली नाही तर अपक्ष निवडणूक लढावी लागेल. अशा प्रकारे त्यांनी मला त्या अटी घातलेल्या आहेत. आमची एकदा दोनदा बैठक झाली आहे आणि आता पुन्हा एक भेट होणार आहे त्यानंतर ठरवणार आहे.