विधानसभा निवडणूक 2024

Rajendra Shingne Join SP NCP: अजित पवारांना बसणार धक्का! आमदार राजेंद्र शिंगणे हाती घेणार तुतारी...

Published by : Team Lokshahi

सिंदखेडराजात अजित पवारांना धक्का बसणार आहे. राष्ट्रवादी आमदार राजेंद्र शिंगणे अजितदादांची साथ सोडणार आणिआमदार राजेंद्र शिंगणे आज हाती तुतारी घेणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र शिंगणे लवकरच हाती तुतारी घेणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. अजित पवार पक्षाला हा मोठा धक्का मानला जात आहे. सिंधखेड राज्यामधील बैठकीत राजेंद्र शिंगणे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करत तुतारी चिन्हाला निवडणूक लढवावी अशी इच्छा व्यक्त केली.

कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत. कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करत असताना जवळपास 99 टक्के कार्यकर्त्यांनी सहकार्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आदरनीय पवार साहेब यांच्या बरोबरचं त्याठिकाणी तुतारी चिन्हावर मी निवडणूक लढवावी अशा प्रकारची मागणी याठिकाणी केली होती असं राजेंद्र शिंगणे म्हणाले होते.

त्याचसोबत ते म्हणाले होते, जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा करुन दोन दिवसात कार्यकर्तांच्या मनातला निर्णय घेतला जाईल आणि आता आमदार राजेंद्र शिंगणे आज हाती तुतारी घेणार आहेत. राजेंद्र शिंगणे हे 5 वाजता जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत तर राजेंद्र शिंगणेंना पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी लढवण्याची शक्यता आहे.

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

Sujay Vikhe On Balasaheb Thorat | सुजय विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका; काय आहे नक्की प्रकरण ?

कोण आहेत विजया रहाटकर? ज्यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी करण्यात आले नियुक्त

Laxman Hake on NCP Sharad Pawar: OBC समाज तुतारीला मतदान करणार नाही, लक्ष्मण हाके यांची घोषणा

Vidhansabha Election Amit thackeray Uddhav thackeray: शिंदे गटाला आता तगडं आव्हान! अमित ठाकरेंना उद्धव ठाकरेंचा पाठिंबा?