राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणेनी काल शरद पवार यांच्या पक्षात घरवापसी केली असून शिंगणेंनी हाती तुतारी घेतली आहे. मात्र यामुळे मतदारसंघात अडचणी वाढल्याच दिसत आहे. शिंगणेंचे कट्टर समर्थक आणि पुतणीने त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहे. गायत्री शिंगणेंची विरोधात निवडणूक लढण्याची भूमिका सिंदखेडराजा मतदारसंघात तयारी सुरू आहे. तर कार्यकर्त्यांनी देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतच राहण्याची भूमिका घेतली आहे. यावेळी शिंगणेंच्यासोबत मोठ्या प्रमाणावर त्यांचे कट्टर कार्यकर्ते आणि पक्षाचे पदधीकारी शरद पवार गटात जातील अशी शक्यता होती.
मात्र त्यांच्या कट्टर कार्यकर्ता आणि पदधीकारी गायत्री शिंगणे यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या विरुद्ध दंड थोपटले असून त्यांच्या सोबत न जाता अजित पवार गटात राहणेच पसंत केले आहे. तर शिंगणे यांच्या विरुद्ध तगडा उमेदवार उभा करण्याची घोषणा देखील केली आहे. राजेंद्र शिंगणे यांचे गेल्या पंचवीस वर्षांपासून समर्थक असलेले जिल्हा अध्यक्ष माजी नगराध्यक्ष एड नाजेर काझी यांनी दोन दिवसापूर्वीच राजेंद्र शिंगणे यांची साथ सोडली आहे आणि आपण अजित पवार गटातच आहोत हे घोषित केले. तर शिंगणे यांचे दुसरे कट्टर समर्थक टी. डी अंभोरे पाटील यांनी तर, अजित पवारांनी राजेंद्र शिंगणे यांना इतके भरभरून दिले असे सांगत शिंगणेंनी अजित पवार यांना सोडलेच कसे असा प्रश्न निर्माण करतं त्यांच्यासोबत कुणीचं पदधिकारी गेले नसून आम्ही शिंगणेंच्या विरोधात तगडा उमेदवार देणार असल्याचे घोषित केले.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि राजेंद्र शिंगणे यांची सख्खी पुतणी गायत्री शिंगणे यांनी शिंगणेंच्या प्रवेशाला विरोध करत, दोन दिवसात राजेंद्र शिंगणेंच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढण्याची भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एकंदरीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पवार गटात घरवापसी करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी त्यांच्यासाठी पुढील वाटचाल बिकट आहे त्यांना सगळ्यात पाहिले आपल्या कट्टर समर्थक आणि सख्या पुतणीशीच झुझावे लागेल हे मात्र नक्की असं दिसून येत आहे.