विधानसभा निवडणूक 2024

Raj Thackeray vs Uddhav Thackeray: शिवसेनेतील सासू कोण? राज ठाकरे यांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा

शिवसेनेतील गद्दारीवर राज ठाकरेंची टीका, उद्धव ठाकरेंना भांडखोर सासूची उपमा.

Published by : Team Lokshahi

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवडी मतदारसंघातून मनसेने बाळा नांदगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या सभेला मनसे पक्षनेते राज ठाकरे यांची उपस्थिती पाहायला मिळाली यावेळेस राज यांचा थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलेला पाहायला मिळाला.

खरा गद्दार हा पक्षात बसला आहे- राज ठाकरे

यावेळी ते म्हणाले की, तुमचा कल आम्हाला कळला आहे तुम्ही कुठे आहात ते. ज्याला महाराजांची प्रतिमा हातात घ्यायला लाज वाटते त्यांच्यासोबत हे बसले आहेत. अनेक लोक जे पळून गेले त्यांना हे गद्दार म्हणतात पण खरा गद्दार तर घरात तिथे पक्षात बसला आहे ज्याने पक्षासोबत गद्दारी केली. पुढे राज ठाकरे उद्धव ठाकरेंना भांडखोर सासू म्हणत त्यांच्यावर टोलेबाजी करायला लागले.

राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना भांडखोर सासूची उपमा

राज ठाकरे म्हणाले, घरात तीन मुल असतात त्यातल्या पहिल्या मुलाच लग्न होत सासू सोबत भांडण होत मुलगा बायकोला घेऊन घर सोडून जातो. मग दुसऱ्या मुलाच लग्न होत त्या सुनेसोबत देखील सासूच भांडण होत तो मुलगा देखील घर सोडून जातो. या दोन्ही वेळेस लोक सुनेला दोष देतात. त्यानंतर तिसऱ्या मुलाचं लग्न होत आणि त्याच्या बायकोसोबत पण सासूच भांडण होत आणि तो मुलगा देखील बायकोला घेऊन घर सोडून जातो.

यावेळी लोक बोलतात खरा प्रोब्लेम सासूचा आहे. असाच काहीसा प्रकार हा शिवसेनेत सुरु आहे. ही जी शिवसेनेतून मुलं बाहेर पडत आहेत ती खरी तर तिथे बसलेल्या त्या पक्षप्रमुख सासूमुळे त्यात त्या मुलांचा दोष नाही. असं म्हणत राज ठाकरेंनी यावेळेस उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. मात्र आता उद्धव ठाकरे यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

Gold Rate Decrese | सोन्याच्या दरात मोठी घसरण; सोन्याच्या भावात 15 दिवसात 5500 रुपयांची कमी

Manipur | मणिपूरमध्ये 'एनडीए'त मोठी फूट; 'एनपीपी'चा सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय | Marathi news

Uddhav Thackarey: अडीच वर्ष झाली, न्याय मागतोय; प्रचार संपण्याआधी उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद

GST Taxpayers News | करदात्यांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा; जीएसटी रिटर्न भरण्यास मुदतवाढ

Anmol Bishnoi arreste : मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक