महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.
मतदान केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, मला असं वाटतं जेवढं मतदान कमी होईल तेवढे त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं. मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करुन एकतर मतदान सगळ्यांनी केलं पाहिजे.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होते की, जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील आणि ते बघायला मिळते आहे. असे राज ठाकरे म्हणाले.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या ताज्या लेटेस्ट अपडेट्स पाहण्यासाठी लिंकवर क्लिक करा: