महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. वेगवेगळ्या पक्षांच्या प्रचारसभांमुळे निवडणुकीची रंगत वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रचारसभेत शरद पवार यांच्यावर टीका केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज ठाकरे खडकवासल्यामध्ये प्रचारासाठी आले असताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज ठाकरे म्हणाले, "शरद पवारांच्या बारामतीमध्ये जा, मग लक्षात येईल की किती उद्योग शरद पवारांनी बारामतीमध्ये आणले. पवार साहेब जर तुम्ही बारामतीत उद्योगधंदे आणले तर महाराष्ट्रात का आणू शकला नाहीत? मग आम्ही तुम्हाला का महाराष्ट्राचे नेते म्हणायचं? असं म्हणत राज ठाकरे यांनी जोरदार प्रहार केला.
थोडक्यात
'शरद पवार हे तालुक्याचे नेते'; राज ठाकरेंचे खडकवासल्यात मोठे विधान
राज ठाकरे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
"...तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्राचे नेते का म्हणायचे?" राज ठाकरे यांचा सवाल
काय म्हणाले राज ठाकरे?
‘महाराष्ट्रात उद्योगधंदे आणले रोजगार दिला. तर तो महाराष्ट्राचा नेता. स्वतःच्या तालुक्यांमध्ये विकास करणारा तालुक्याचा नेता’ असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांवर विखारी टीका केली आहे. खडकवासला मतदारसंघातील मनसेचे उमेदवार मयुरेश वांजळे यांच्या प्रचार सभेत राज ठाकरेंनी वक्तव्य केलं आहे.
राज ठाकरे यांचं खडकवासला येथील संपूर्ण भाषण पाहा-