निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत.
याच पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेसची बैठक झाली. या काँग्रेसच्या बैठकीत जागावाटपावरून राहुल गांधी नाराज झालं असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधीजी यांना मी ओळखतो. अनेक वर्ष ओळखतो. राहुल गांधीजी यांनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत काही एखादी भूमिका मांडली असेल तर त्याला मी नाराजी म्हणत नाही. तिन्ही पक्ष या महाराष्ट्रात तोलामोलाचे आहेत. हे राहुलजींना माहित आहे.
यासोबतच ते म्हणाले की, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल दोन्ही पक्षांच्या नेत्यांचे राहुल गांधीशी अत्यंत मधुर संबंध आहेत. जर त्यांनी नाराजीच व्यक्त केली असती, जर त्यांना चर्चाच करायची असती तर आमच्या दोन नेत्यांशी त्यांनी जरुर चर्चा केली असती. या बाहेर आलेल्या राहुलजी विषयीच्या ज्या गोष्टी आहेत. यावर विश्वास ठेऊ नका. असे संजय राऊत म्हणाले.