विधानसभा निवडणूक 2024

Priyanka Gandhi Rahul Gandhi: प्रियंका गांधींच्या प्रचाराला राहुल गांधींचा पाठिंबा, वायनाडमध्ये करणार प्रचाराला सुरुवात

केरळमधील वायनाड येथे होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून पुन्हा प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

Published by : Team Lokshahi

विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वपक्षांना आता प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस उरले आहेत. याचपार्श्वभूमीवर केरळमधील वायनाड येथे होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी आजपासून पुन्हा प्रचाराला सुरुवात करणार आहेत. ज्यासाठी राहुल गांधी सकाळीच वायनाडला रवाना झाले आहेत, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आजपासून केरळमधील वायनाडमध्ये होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी पुन्हा प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

प्रियंका गांधी आज सकाळी ११ वाजता राहुल गांधी यांच्यासह मनंतवाडी येथील गांधी पार्कमध्ये संयुक्त सभेला संबोधित करतील आणि त्याच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी समर्थकांच्या भेटीगाठी घेतील. प्रचार अभियानांतर्गत राहुल गांधी एरीकोड येथील जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. प्रियंका गांधी ४ नोव्हेंबर रोजी कलपेट्टा आणि सुल्तान बाथरी विधानसभा मतदारसंघातील पाच ठिकाणी होणाऱ्या सभांना संबोधित करणार आहेत. तर निवडणुकीच्या रिंगणात प्रथमच उतरलेल्या प्रियंका गांधी ७ नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये राहणार आहेत.

औषधी गुणधर्म असणाऱ्या आवळ्यापासून घरच्याघरी बनवा चांगल्या प्रतीचा च्यवनप्राश

Latest Marathi News Updates live: वाराणसीत देव दिवाळीनिमित्त मोठा उत्साह...

Nana Patole On Mahayuti:अजित पवारांसह महायुतीवर पटोलेंचा निशाणा, भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप...

Nilesh Lanke Beed : पवारसाहेबांची पावसातील सभा परिवर्तन घडवणारी, 'मविआ'चं सरकार येणार : लंके

Sayaji Shinde In Dilip Mohite: 'दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा' , दिलीप मोहिते यांच्या प्रचारात सयाजी शिंदे यांचं आवाहन