विधानसभा निवडणूक 2024

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दिवशी येणार पुणे दौऱ्यावर

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. 8 किंवा 9 नोव्हेंबर रोजी मोदी पुणे दौऱ्यावर येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात जाहीर सभा होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा पुणे दौरा असणार आहे.

पुण्यातील महायुतीच्या सर्व 8 विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्रित सभा घेणार असून भाजपकडून शहरात अनेक केंद्रीय नेत्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

Salman Khan : अभिनेता सलमान खानला पुन्हा जीवे मारण्याची धमकी

Uddhav Thackeray : रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 'या' तारखेला उद्धव ठाकरेंची जाहीर सभा

आमदार सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल

झिशान सिद्दीकी, सलमान खान धमकी प्रकरण; 20 वर्षीय तरुणाला अटक