थोडक्यात
नरेंद्र मोदींची 14 नोव्हेंबरला नवी मुंबईत सभा
खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये मोदींची सभा पार पडणार
सभेमुळे वाहतुकीत मोठा बदल
निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदींची 14 नोव्हेंबरला नवी मुंबईत सभा होणार आहे.
खारघरच्या सेंट्रल पार्कमध्ये पंतप्रधान मोदींची ही सभा पार पडणार असून सभेमुळे वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. नवी मुंबई वाहतूक पोलिसांनी गुरुवारी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत काही मार्गावर वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे.
गुरुद्वारा चौक ते जे कुमार सर्कल मार्ग बंद ठेवण्यात येणार असून ग्रामविकास भवन येथून उजवीकडे मूर्वी गाव स्मशानभूमीमार्गे जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे. तसेच, तळोजा जेलकडून येणाऱ्या वाहनांना ओवेगाव चौकातून जाण्यासाठी पर्यायी मार्ग आहे. या सभेमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.