विधानसभा निवडणूक 2024

Prakash Ambedkar On Jarange Patil: प्रकाश आंबेडकरांचं जरांगेंना आवाहन, म्हणाले...

मनोज जरांगे यांनी कोणाला मतदान करू नये, हे जाहीर करावं, असं आवाहन वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी केल आहे. "माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे,

Published by : Team Lokshahi

प्रकाश आंबेडकरांच्या सभांना 9 नोव्हेंबर सुरुवात होणार असून साखर कारखाना, उसातील लीडरशिप आता बुजगावणी झालेली आहे. त्यामुळं जनता आता नव्या चेहऱ्यांना संधी देईल. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 9 नोव्हेंबरला सोलापूर येथून सभांना सुरुवात करतोय. माझ्या तब्येतीबाबत बऱ्या-वाईट प्रतिक्रिया दिल्या, त्या सर्वांचे आभार मानतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी प्रचार करेन.

"माझी जरांगे पाटील यांना विनंती आहे, प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी काकाला मतदान दिलं काय अन पुतण्याला मतदान दिलं काय? सत्ता ही कुटुंबात राहणार आहे. त्यामुळं एक खूणगाठ बांधून, यातील किती लायक अन किती नालायक आहेत. याबाबत स्पष्टता करून कोणाला मतदान करायचं नाही, हे जाहीर करायला हवं. जरांगे पाटील यांचा विधानसभेतील रोल संपला असं आम्ही मानत नाही. सत्तर टक्के जागा ओबीसी समाजातील इच्छुकांना देण्यात आलेत. हे पाहता मराठा समाजाचे मतदान एकतर्फी होऊ शकतं. तसेच ओबीसीचे मतदान ही एकतर्फी होईल, अशी परिस्थिती आहे. ओबीसी समाज वंचितकडे वळाला आहे, असा आमचा दावा आहे. आम्ही त्यांच्यासाठी लढतोय, त्यामुळं हा वर्ग आमच्यासोबत येईल.

शेत मालाचा हमीभाव हा मुद्दा महत्वाचा आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी वंचित कायदा करेल. व्यापाऱ्यांना आम्ही या कायद्यात आणू, जो याचं उल्लंघन करेल त्यांना गुन्हेगार समजण्यात येईल, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. कमीतकमी पाच वर्षांची शिक्षा असेल. आमचे पंधरा आमदार निवडून आले तरी येणाऱ्या सत्तेत आम्ही भागीदार राहू, मग सोयाबीन आणि कापूसला योग्य मोबदला मिळावा, यासाठी आम्ही पाचशे रुपये प्रति क्विंटल बोनस द्यायला लावणार आहे.

राज्याची लोकसंख्या 13 कोटीच्या घरात आहे, त्यामुळं आता दोन लाख रोजगार निर्मितीची गरज आहे. उंबरठे झिजवणारा वर्ग संपवायला हवा. तेंव्हा घराणेशाहीचं राजकारण संपुष्टात येईल. मोहम्मद पैगंबर, शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, संतांचे, दैवतांची नावं घेऊन दंगली घडवली जातायेत. आमचा अजेंडा सरकारमध्ये जाण्याचा असेल, ज्याला आमचा पाठिंबा हवा आहे. कोणाला कोणाची विटंबना करण्याचा अधिकार नाही, त्याअनुषंगाने आम्ही नवा कायदा आणू." असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

Latest Marathi News Updates live : फडणवीस यांची मविआच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल

Eknath Shinde Kolhapur Speech | अडीच वर्षात काय केलं? ठाकरेंनी दाखवावं, एकनाथ शिंदेंचं आव्हान

Uddhav Thackeray UNCUT Speech | 'घरफोड्या' म्हणत उद्धव ठाकरे यांचा एकनाथ शिंदेवर हल्लोबाल | Lokshahi

विरोधकांवर टीका, मधुरिमाराजे यांच्याबद्दल खंत चित्रा वाघ काय म्हणाल्या पाहा...

Devendra Fadnavis On MVA: "पहिला आपलं घर सुधरवा आणि नंतर आम्हाला सांगा" कोल्हापुरच्या सभेत फडणवीसांची मविआवर टीका