थोडक्यात
विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला, ज्यामुळे राज्यात महायुतीचं सरकार स्थापनेसाठी मार्ग मोकळा झाला.
नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी २५ तारखेला होणार, अशी महायुतीकडून घोषणा.
महायुतीचा आगामी मुख्यमंत्री भाजपाचाच असणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला, आणि महायुतीने दणदणीत विजय प्राप्त केला आहे. यामुळे राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे, हे जवळपास निश्चित झालं आहे. महायुतीकडून २५ तारखेला नव्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीची घोषणा करण्यात आली आहे. यासोबतच आता मुख्यमंत्री कोण होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या संदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा भाजपाचाच असणार, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
राज्यात महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा भाजपचाच असणार, विश्वसनीय सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. तर महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार असल्याचं बोललं जात आहे. महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे ही प्रमुख पदं कायम राहणार आहेत. पण, सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा भाजपचाच असेल. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा सत्तेत योग्य सन्मान दिला जाणार, अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे.