धुळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांची जाहीर सभा झाली त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर तिथे जमलेल्या जनतेसोबत संवाद साधला. त्यावेळी एक है तो सेफ है, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नवा नारा देण्यात आला आहे. एकजूट राहिलात तर ताकद वाढवणार अस नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून आता प्रचाराला सुरुवात झाली आहे. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील धुळे आणि नाशिक येथे सभा घेतली आणि त्यादरम्यान त्यांनी कॉंग्रेस आणि मविआवर देखील अनेक टीका केल्या तसेच महायुतीचे सरकार आल्यास अनेक कामांना नवीन उपक्रमांना सुरुवात करु असं वचन देखील दिलं.