प. महाराष्ट्र

Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा एमआयएम पक्ष लढवणार

Published by : Siddhi Naringrekar

सतेज औंधकर, कोल्हापूर

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात एम आय एम पक्षाने एन्ट्री केल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या पाच जागा लढवणार असल्याची घोषणा एमआयएम पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ.महेश कुमार कांबळे यांनी केली आहे.

यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, इचलकरंजी, कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण या पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

राज्यात सरकार कोणतेही असो मात्र मुस्लिम आणि दलितांचे प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळेच येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुका एम आय एम पक्ष ताकदीने लढवेल असे त्यांनी यावेळी सांगितले.

माजी मंत्री सुरेश नवले बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार; म्हणाले...

चंद्रपूरच्या कोरपनामध्ये बोगस मतदारांचा मुद्दा ऐरणीवर

Sameer Bhujbal | छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हाती मशाल घेणार ? नांदगावमधून लढण्यासाठी इच्छुक

पुणे ड्रग्ज प्रकरणाचे लंडन कनेक्शन उघड; पुण्यातून तब्बल 218 किलो ड्रग्ज लंडनला पाठवलं

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नागरिकांनी घातला साडे 5 लाखांच्या नोटांचा हार