कोकणामध्ये एकूण ३९ विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकशाही आणि 'रूद्र'च्या एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळण्याची शक्यता आहे पाहुयात-
भाजप - ०७
शिवसेना - ११
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ०१
काँग्रेस - ०१
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - ०६
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - ०६
वंचित - ००
इतर - ०७
कोकणातील प्रमुख लढती कोणत्या?
किरण सामंत वि. राजन साळवी (राजापूर),
दीपक केसरकर वि. राजन तेली (सावंतवाडी),
नीलेश राणे वि. वैभव नाईक (कुडाळ),
भरत गोगावले वि. स्नेहल जगताप (महाड).
एकूण मतदार संघ – १५
लोकशाही आणि 'रुद्र'चा अचूक आणि वेगवान एक्झिट पोल आता आपण लोकशाही मराठीवर पाहणार आहोत. यासाठी आपल्याकडे चर्चेसाठी मान्यवर उपस्थित असून आपण त्यांचाशी एक्झिट पोलवर सखोल चर्चा करुन ती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. राज्यात सरासरी 58 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईमधील जागांचा एक्झिट पोल
मुंबईमध्ये विधानसभेच्या ३६ जागा आहेत. लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार मुंबई विभागात ठाकरेंच्या शिवसेनेला सर्वाधिक 14 तर भाजपला 12 जागा मिळण्याची शक्यता आहे. मुंबईत ठाकरेंची शिवसेनाच मोठा पक्ष ठरण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भाजप - १२
शिवसेना - ०२
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ०१
काँग्रेस - ०५
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - १४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - ०१
वंचित - ००
इतर - ०१
विदर्भात कोणाचं पारडं भारी? महायुती की मविआ घरी?
विदर्भात विधानसभेच्या सर्वाधिक ६२ जागा आहेत. विदर्भामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील घटकपक्षांना किती जागा मिळणार याचा अंदाज समोर आला आहे. लोकशाही रुद्रच्या एक्झिट पोलनुसार विदर्भात भाजपला 23 तर काँग्रेसला 21 जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेस विदर्भाचा गड राखणार का याकडे लक्ष वेधलं आहे.
भाजप - २३
शिवसेना - ०४
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - ०४
काँग्रेस - २१
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) - ०४
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - ०४
वंचित - ००
इतर - ०२
विदर्भातल्या बिग फाईट कोणत्या असणार आहेत?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दक्षिण-पश्चिम नागपूर मतदासंघातून सातव्यांदा रिंगणात
भाजपचे देवेंद्र फडणवीस विरूद्ध काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे यांच्यात थेट लढत
कामठी विधानसभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंच्या विरोधात काँग्रेसचे सुरेश भोयर मैदानात
साकोली विधानसभेत नाना पटोलेंसमोर भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांचं आव्हान
ब्रह्मपुरी विधानसभेत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा भाजपचे कृष्णलाल सहारे यांच्यासोबत सामना
तर बल्लारपूर विधानसभेत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे संतोष सिंह रावत यांच्यात लढत