विधानसभा निवडणूक 2024

धनंजय मुंडेंच्या परळीत राडा; EVM मशीन्स फोडले, केंद्राध्यक्षाला मारहाण

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मतदारसंघात चार मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएम मशिन्स फोडल्यामुळे मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. केंद्राध्यक्ष मुंडे यांना मारहाण करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Published by : shweta walge

बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ मतदारसंघात तोड़फोड झाल्याची माहिती समोर आली आहे. परळीतील चार मतदान केंद्रांमध्ये ईव्हीएम मशिन्स फोडण्यात आल्या आहेत. यामुळं या मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रिया बंद झाली आहे.

बोगस मतदानावरून झालेल्या वादात शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद परळीत त्यांच्या घाटनांदूरच्या मतदान केंद्रांवर तणाव दिसला. दुपारी बाराच्या सुमारास तालुक्यातील घाटनांदूर येथील सोमेश्वर विद्यालय व जिल्हा परिषद शाळेच्या बुथवरील केंद्राध्यक्ष मुंडे यांना काही युवकांनी मारहाण करत चार मशीनची तोडफोड केली. यावेळी केंद्राध्यक्ष मुंडे यांना तात्काळ आंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यावेळी पोलीस उपाधिक्षक चोरमले यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

सोमेश्वर विद्यालयातील बुथ क्रमांक २८०, २८१, २८३ व जिल्हा परिषद शाळेतील बुथक्रमांक २८२ या केंद्रावरील चार मशीनची तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेचे फोटो देखील समोर आले असून केंद्रात मतदानाचं साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत पडलं आहे.

भाजपाने संभाजीनगरात पैसे वाटल्याचा इम्तियाज जलील यांचा गंभीर आरोप

अमरावतीत इव्हीएमच पळवले? पाहा नेमकं काय घडलं?

Shrikant Shinde: मुख्यमंत्रिपदासाठी महायुतीत स्पर्धा नाहीच, श्रीकांत शिंदेंचं वक्तव्य

Most Polluted City: दिल्ली जगातील सर्वांधिक प्रदूषित शहर

Cold Drink: कोल्ड्रिंकची बॉटल अर्धी का भरलेली असते? "हे" आहे कारण