विधानसभा निवडणूक 2024

NCP SP trumpet issue: ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना फटका? 9 उमेदवारांचा झाला पराभव

ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवारांच्या 9 उमेदवारांचा पराभव, राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला चिन्ह गोठवण्याची मागणी.

Published by : Team Lokshahi

ट्रम्पेट चिन्हामुळे शरद पवारांच्या उमेदवारांना फटका बसला असल्याची माहिती समोर आली आहे. ट्रम्पेटमुळे पवारांच्या 9 उमेदवारांचा पराभव झाला असल्याचा दावा पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते शरद गोरे यांनी केला आहे. विधानसभेच्या निवडणूकीत ट्रम्पेट या चिन्हा मुळे आम्हच्या ९ उमेव्दरांचा पराभव झाला आहे तरी निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवावे अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.

दिलीप वळसे पाटील काय म्हणाले-

ट्रम्पेट काही मत घेतली त्याचा लाभ मला पण झाला पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला की नाही झाला यावर काही चर्चा झाली नाही असं वक्तव्य यादरम्यान दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.

रोहित पवार ट्वीट करत म्हणाले-

वर्तमानपत्रात आलेली ही आकडेवारी पाहिली तर लोकशाहीवर विश्वास असलेल्या प्रत्येकाची चिंता वाढल्याशिवाय राहणार नाही. कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार नावाच्या डमी उमेदवारालाच ट्रँपेट चिन्ह कसं मिळालं? निवडणूक आयोगाने संभ्रम दूर करणं अपेक्षित आहे की संभ्रम निर्माण करणं? हा अत्यंत साधासरळ प्रश्न आहे. प्रश्न साधा आसला तरी विचारात टाकणारा आहे. अपेक्षा आहे की, याबाबतचं सत्य समोर यावं आणि लोकशाहीलाच सुरुंग लावणारे हे प्रकार थांबावेत...

Latest Marathi News Updates live: चालत्या गाडीने घेतला अचानक पेट; पनवेलमधील घटना

Maharashtra New CM Oath Ceremony Date | सत्तास्थापन लांबणीवर? Mahayuti

Rohit Pawar On Ram Shinde | अजित पवारांची तक्रार करणं हा रडीचा डाव, रोहित पवारांचा राम शिंदेंना टोला

Rajesh Tope Post | विझलो आज जरी मी.., निवडणुकीत पराभवानंतर राजेश टोपे यांची भावनिक पोस्ट | Lokshahi

26/11 Terror Attack: देशाला हादरवणारा दिवस! नेमकं काय घडलं होत 26/11 ला?