निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता नरहरी झिरवाळ यांनी शरद पवार यांच्याविषयी एक मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगल्या आहेत.
नरहरी झिरवळ म्हणाले की, साहेबांना कुणी चॅलेंज करुच शकत नाही. पण मला खात्री आहे. मीच नाही तर सगळीचजण आज महाराष्ट्रातलं कोणीही विरोधक साहेबांचे असतील तर ते फक्त निवडणुकांमध्येच विरोध दर्शवतात. बाकीच्यावेळेला साहेबांना दैवतच समजतात. मी तर असे म्हणेन की, माझं कामकाज हे साहेबांना माहित आहे. त्याच्यामुळे माझी गरज ही समाजाला आहे. साहेबांना आहेच आहे पण समाजाला आहे. म्हणून मला साहेब त्यापद्धतीचा आशीर्वाद दुरून का होईना आशीर्वाद देतील. असे नरहरी झिरवळ म्हणाले.