निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आता भंडारा मतदारसंघात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नरेंद्र भोंडेकर उमेदवारी अर्ज दाखल करण्यावर ठाम असल्याचे पाहायला मिळत आहे.
भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी कार्यकर्ता मेळावा घेत पक्षांनी तिकिट नाकारली तरी 28, 29 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले. नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, मी अपक्षच आमदार निवडून आलो आहे. सगळ्यांची भावना तुम्ही माझ्या अगोदरचं भाषण बघा सगळ्यांची हीच भावना होती की, आपल्याला तिकीट मिळाली नाही मिळाली तरी आपल्याला लढावं लागेल. असे ते म्हणाले.