विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं असून उद्या मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून कोणाचं सरकार सत्तेत येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
याच पार्श्वभूमीवर अजून एक चर्चा आहे ती म्हणजे मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार आणि कोण होणार यावरही चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. यावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत.
यातच संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, मुख्यमंत्रीपदाचा निर्णय महाराष्ट्रात होईल. काँग्रेसचं जे प्रमुख नेते येथे येतील. शरद पवार साहेब मुंबईतच असतात, उद्धव ठाकरे साहेब मुंबईत आहेत. आम्ही कोणताही वेळ न घालवता निर्णय घेऊ.
यावर नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. असं नाना पटोले म्हणाले.