सध्या राजकीय वर्तूळात अनेक घडामोडी पाहायला मिळत आहे. लोकसभेला जे चित्र राजकीयवर्तूळात पाहायला मिळत होत तेच चित्र आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बदलेलं दिसत आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार अशी घोषणा केली. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. तर याच निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नात्यांमध्ये देखील बदलाव पाहायला मिळाले आहेत. अनेक राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद, सभा घेत आहेत. याचपार्श्वभूमीवर भंडारा येथील सभेत नाना पटोले महायुतीवर टीका करत म्हणाले,
अजित पवार यांची चावी ही जनतेच्या हातात आहे - नाना पटोले
भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप आहे, राज्यात 23 तारीख ला महाविकास आघाडीच सरकार येणार असून आता चाबी त्यांच्या जवळ आहेत मोदींनी वेगळी चाबी दिली असेल तर मला माहित नाही भोपाळ मधून 70 हजारच नॅशनल करप्टेड पार्टी आहे त्यांच्या हातात चाबी आहे लोकशाही मध्ये असं होतं नाही बहुमताच महाविकास सरकार महाराष्ट्र मध्ये येणार तर अजित पवार यांची चाबी जनतेतच्या हातात आहे आता चाबी ही महाविकास आघाडीच्या हातात येणार आहे भ्रष्ट्राचारी व्यवस्था म्हणजे भाजप आहे महाराष्ट्रतील फुले शाहू आणि आंबेडकर विचाराला काळी मोल करण्याचं काम ह्या सरकारने केले आहे.
भाजपला मनस्मृतीचे दात आहेत हे महाराष्ट्रातील जनतेने ओळखले आहे ;- नाना पटोले
महाराष्ट्र मध्ये दंगली घडल्या यात मुस्लिम बांधवांच गुन्हे मागे घेण्याचा महाविकास आघाडीने मान्य केले असल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप असून यावर प्रतिउत्तर देतांना नाना पटोले म्हणाले की,साडेसात वर्षे यांनी काही गोळ्या खेळल्या तुम्ही काय केले काही नाही केलं हे सर्व दिसणार आहे. हिंदू मुस्लिम महाराष्ट्र मध्ये बंद झाले आहे.
पंकजा मुडें सांगतात की कंटेंगे कंटेंगे महाराष्ट्र मध्ये चालणार नाही आता शेवटचा हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करू नका शेतकऱ्यांसाठी काय करू शकता हे काहीच केलं नाही अडीज वर्ष काय केलं शेतकऱ्यांच्या धानाला भाव का नाही दिला महिलांवर झालेल्या अत्याचारावर का चूप आहात म्हणून हे सगळें प्रश्न हातातून निघाले आहेत महाराष्ट्रच्या जनतेने आता भाजप मनुस्मृतीचे दात आहेत हे ओळखले आहेत. भाजपने हिंदुत्वाच्या नावावर ओबीसीला जाळ्यात अडकवले तो मात्र आता ओबीसी ने सर्व ओळखले आहे.