नाना पटोले काँग्रेस नेते यवतमाळ
नेते आणि मंत्र्यांच्या बॅग तपासणीवरून राजकीयवर्तूळ सध्या तापलेलं पाहायला मिळत आहे. मविआच्या बॅग तपासणीवरून मविआचे नेतेमंडळी चवताळले आहेत अशा टीका महायुतीकडून करण्यात येत आहेत. अस सगळ असताना आता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरप्राईज पद्धतीने बॅगा तपासा आशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी यवतमाळमध्ये केली आहे.
यावेळी नाना पटोले म्हणाले आहेत की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरप्राईज पद्धतीने बॅगा तपासा त्यांच्या बॅगमध्ये लाखो रुपये आहे आणि भ्रष्टाचाराने कमवलेले सर्व पैसे त्यांच्या बॅगमध्ये सापडतील सरप्राईज बॅग तपासणी केल्यास नक्की सापडतील दिखावू पणा करू नका असा टोला नाना पटोले यांनी आज घाटंजीत येथे लगावला आहे काँग्रेस नेते नाना पटोले आज काँग्रेस उमेदवार जितेंद्र मोघे यांच्या प्रचारार्थ घाटंजी येथे आले होते यावेळी ते बोलत होते लोकसभेत दारुण पराभव झाल्यानंतर यांनी लाडकी बहीण योजना आणली मात्र बहिणीच्या मागे लपण्याची वेळ यांच्यावर आलेली आहे आणि दाजीच्या खिशातून यांनी 5000 रुपये काढले आहे असेही नाना पटोले यांनी म्हटलं कापूस उत्पादक शेतकरी धान उत्पादक आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या शेतमाला भाव नाही मात्र हे कटेंगे बटेंगे हेच सध्या करत आहे बहुजनांना कुत्र्याची उपमा देऊन हे गलिच्छ राजकारण करत आहे ।
महाराष्ट्र वाचवणे हे सध्या सर्वात महत्त्वाचं काम आहे महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा उमेदवार कोण हे पक्षश्रेष्ठी ठरवतील असेही नाना पटोले यांनी म्हटलंय महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना सावकाराकडे जायची गरज भासणार नाही असेही नाना पटोले यांनी म्हटलं सध्या विरोधकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय आमच्या बॅगा तपासून यांना काहीच मिळणार नाही बॅगा तपासायचा असेल तर मोदी शहांच्या तपासा असेही नाना पटोले यांनी म्हटलं आम्ही जनतेचे प्रश्न घेऊन पुढे जातोय वन्य प्राण्यांपासून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी आम्ही पुढे योजना आणू असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे