मुंबई

Vijay Wadettiwar : 'या' दिवशी येणार काँग्रेसची पहिली यादी विजय वडेट्टीवार म्हणाले...

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

यातच आज महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. महाविकास आघाडीत अद्याप मुंबईतील 3 जागांवर तिढा असल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे.

या बैठकीसाठी आले असता माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, 216 जागांचं पूर्ण झालेलं आहे आणि उर्वरित जागांचं वाटप आज संपेल. 20 तारखेला पहिली काँग्रेसची यादी येण्याची शक्यता आहे. या 216 जागेंमध्ये 84 जागा काँग्रेसच्या वाटेला आलेल्या होत्या. आम्ही आमच्याकडे केंद्रीय निवड समितीच्या पुढे आम्ही 20 तारखेला जात आहोत.

यासोबतच ते पुढे म्हणाले की, 20 तारखेला संध्याकाळी पहिली यादी येण्याची अपेक्षा आहे आणि उर्वरित जागा आज वाटप झाल्यानंतर कदाचित 20 तारखेला अंतिम यादी देखील येऊ शकेल. आज जागेवर सर्व तोडगा निघाला उर्वरित 66 जागेवर आणि तो होईल आज बैठक त्यासाठीच आहे आणि कुठेही अडचण येणार नाही. जिंकण्याचा निर्धार केलेला आहे. असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

Maharashtra Assembly Election: 'आप' पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढणार नाही! पक्षाचं दिल्लीवर विशेष लक्ष...

BJP Vidhan Sabha Election Updates : भाजप सुमारे 153 जागांवर लढण्याची शक्यता

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस सतर्क

Radhakrishna Vikhepatil Meet Manoj Jarange Patil : राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

Radhika Apte Pregnancy : राधिका आप्टे होणार आई! एका फेस्टिव्हल दरम्यान फ्लॉन्ट केला बेबी बंप...