मुंबई, पुणे

वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी? भाजपच्या शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. यातच आता वरळी विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर येत आहे. भाजपच्या शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती मिळत आहे.

वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी असा सामना पाहायला मिळणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघात मशाल विरुद्ध धनुष्यबाण अशीच लढत करण्याची महायुतीची रणनीती असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे् आता ही निवडणूक कोण जिंकणार? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Dhanteras Diwali 2024: 'या' कारणामुळे धनत्रयोदशीला लावला जातो यमच्या नावाने दिवा; जाणून घ्या.

'काँग्रेसची 96 जागांवरील चर्चा पूर्ण​'; काँग्रेस-शिवसेनेत कसलाही वाद आता नाही - नाना पटोले

कॉंग्रेसची पहिली यादी लांबणीवर, 'या' तारखेला जाहीर होणार जाहीर

भारत - चीन सीमावादावर तोडगा निघणार? परराष्ट्र मंत्री S.Jaishankar यांचं मोठं विधान | Marathi News

कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील यांना उमेदवारी जाहीर, काय म्हणाले पाहा...