मुंबई, पुणे

Sulbha Gaikwad यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कल्याणमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

Published by : Team Lokshahi

लोकसभा निवडणुकीआधी कल्याण पूर्व या मतदारसंघाने सगळ्यांचे लक्ष वेधले होते. कल्याण पूर्वचे भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. यावेळी महेश गायकवाड यांचे सहकारी राहुल पाटील यांना देखील गोळ्या लागल्या होत्या. या गोळीबाराची चर्चा देशभरात झाली होती. सुदैवाने महेश गायकवाड आणि राहुल पाटील या गोळीबारातून बचावले. या घटनेनंतर महायुतीकडून ही जागा भाजपला मिळणार का हा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, भाजपने गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना तिकीट दिले. आज सुलभा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज भरत जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील महायुतीच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांनी आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. या रॅलीत मंत्री रविंद्र चव्हाण, भाजप नेते विनोद तावडे, माजी मंत्री कपिल पाटील, आमदार कुमार ऐलानी, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आरपीआयचे दलीत मित्र अण्णा रोकडे, शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका माधुरी काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. कल्याण पूर्वेतील आमदार गणपत गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून निघालेली ही रॅली तिसगाव नाका, विजय नगर मार्गे केडीएमसीच्या ड प्रभाग क्षेत्र कार्यालयातील निवडणूक कार्यालयापर्यंत ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली.

जनतेची सेवा करण्यासाठी आणि कल्याण पूर्वेचा विकास करण्यासाठी आपण कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज भरत असल्याची प्रतिक्रिया महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी दिली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआयचे सर्व नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांचे असणारे अमाप प्रेम हे आजच्या या रॅलीत झालेल्या गर्दीवरून दिसत असल्याचं त्या म्हणाल्या.

गेल्या 6-8 महिन्यांत कल्याण पूर्व मतदार संघ पूर्ण पिंजून काढत प्रत्येक नागरिकाला भेटल्या. त्यामुळे अवघ्या 12 तासात हा जनसमुदाय जमलेला पाहायला मिळाला. सुलभा गायकवाड यांनी महायुतीच्या माध्यमातून विकासकामे केली आहेत. आज गणपत गायकवाड यांच्यानंतर सुलभा गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे. यासाठी महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे. "आजच्या या गर्दीवरून दिसून येत आहे. विजय हा त्यांचाच आहे. महायुतीl या भागात वर्षानुवर्षे निवडणूक लढत आली असून महाराष्ट्राच्या जनतेच्यासाठी महाराष्ट्रात महायुतीचा प्रत्येक उमेदवार जिंकणं आवश्यक आहे. त्यामुळे सुलभा गायकवाड महायुतीच्या वतीने प्रचंड बहुमताने विजयी होतील" असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

Sharad Pawar Candidate List: अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार लढत

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी २० नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर

शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर, जयंत पाटील रिंगणात

Maharashtra Assembly Elections : मोठी बातमी! राज्यात विधानसभेच्या मतदानादिवशी सुट्टी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची पहिली यादी जाहीर