मुंबईतील वरळी मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरे आणि मनसेकडून संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अद्याप महायुतीतून या ठिकाणी कोणालाही उमेदवारी जाहीर झालेली नाही. वरळीची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"वरळीतून शिवसेनेने जय शहांना उमेदवारी द्यावी अन्यथा शिंदेंनी स्वत उभं राहावं", असा खोचक टोला राऊतांनी शिंदेंना लगावला आहे. तर आम्ही कधी जागावाटपासाठी आणि निर्णय देण्यासाठी दिल्लीत गेलो नाही असंही राऊतांनी म्हटलं आहे. त्यावर भाजप नेते नितेश राणेंनी प्रत्त्युत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदेच्या विरोधात आदित्य ठाकरे उभा राहणार होते त्याच काय झालं? आदित्य ठाकरे केवळ पोकळं धमक्या देतात असा हल्लाबोल नितेश राणे यांनी केला आहे.
दरम्यान, मिलिंद देवरा वरळीतून लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्या संदर्भात मिलिंद देवरा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात मिलिंद देवरा लढत पाहायला मिळणार आहे.