निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
यातच आज महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे. ही बैठक हॉटेल ताजमध्ये होणार असून या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे. महाविकास आघाडीत अद्याप मुंबईतील 3 जागांवर तिढा असल्याची माहिती मिळत आहे.
मुंबईतील जागावाटप जवळपास निश्चित झाले असून अजून 3 जागांवर चर्चा सुरू आहे. जागावाटपापूर्वी महाविकास आघाडीची मुंबईत ही शेवटची बैठक असणार आहे.
येत्या २ दिवसांत जागावाटप पूर्ण होणार असून उमेदवारी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. बैठकीनंतर घेण्यात येणाऱ्या पत्रकार परिषदेतून कोणत्या महत्वाच्या घोषणा करण्यात येतील हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.