मुंबई, पुणे

मुरबाडमध्ये महायुतीकडून किसन कथोरे यांनी भरला अर्ज

मुरबाड विधानसभेचे भाजपाचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Published by : Team Lokshahi

मुरबाड विधानसभेचे भाजपाचे विद्यमान आमदार आणि महायुतीचे उमेदवार किसन कथोरे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. "यंदा फक्त विजयाचाच नव्हे, तर विक्रमाचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी यावेळी दिली.

"मुरबाड विधानसभेत मागील 20 वर्षे मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केली असून ही विकासाची दृष्टी मुरबाडकरांनी ओळखली आणि त्याचीच पोचपावती आज जमलेल्या गर्दीतून त्यांनी मला दिली," असंही आमदार किसन कथोरे म्हणाले. "यंदाची निवडणूक थेट लोकांनीच हातात घेतलेली असून फक्त विजय नव्हे, तर एका नव्या विक्रमाचा मला विश्वास आहे," असंही यावेळी कथोरे यांनी सांगितले.

यावेळी भाजपाचे राजेंद्र घोरपडे, रमेश सोळसे, राजन तेली यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबतच राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस प्रमोद हिंदुराव, आशिष दामले, शिवसेनेचे एकनाथ शेलार, प्रवीण राऊत हे देखील उपस्थित होते.

Congress Candidate List 2024: काँग्रेसची पहिली यादी जाहीर

निवडणुकीच्या धामधुमीत गेल्या 24 तासात 52 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

Congress Candidate List 2024 : कॉंग्रेस उमेदवारांची पहिली यादी जाहीर; 48 उमेदवारांची घोषणा; पाहा कुणाला कुठून संधी?

"महायुतीचं ट्रिपल इंजिन सरकार सत्तेत येणार", मंत्री मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य

Mahayuti Meeting with Amit Shah | महायुतीत जागावाटपावर खलबतं; दिल्लीत शाहांच्या निवासस्थानी बैठक