worli matdarsangh 
मुंबई, पुणे

वरळीत मिलिंद देवरा, संदीप देशपांडे, आदित्य ठाकरे यांच्यात लढत

वरळीत शिवसेना शिंदे गटाचे नेते मिलिंद देवरा वि. मनसे नेते मनसे नेते संदीप देशपांडे वि. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यात लढत

Published by : Team Lokshahi

उमेदवाराचे नाव : मिलिंद देवरा

मतदारसंघ : वरळी

पक्षाचे नाव: शिवसेना (शिंदे गट)

समोर कोणाचं आव्हान: आदित्य ठाकरे, संदीप देशपांडे

मिलिंद देवरा यांनी २००४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर मुंबईच्या दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला.

त्यानंतर, त्यांनी २००९ मध्ये पुन्हा निवडणूक लढवून यश मिळवले. त्यांच्या कार्यकाळात, त्यांनी अनेक सामाजिक आणि विकासात्मक योजनांची अंमलबजावणी केली आहे.

देवरांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सामाजिक कार्याला प्राधान्य दिले आहे. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणासारख्या क्षेत्रांमध्ये काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक शैक्षणिक संस्थांची स्थापना करण्यात आली आहे.

जानेवारी २०२४ मध्ये मिलिद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी देऊन शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना राज्यसभा मिळाली होती. असे असले तरीही त्यांना आता पक्षाने विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मैदानात उतरवले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महाराष्ट्रात पोस्टल मतमोजणीला सुरुवात

Nashik Vidhan Sabha Result | नाशिकमध्ये पुन्हा भुजबळांची हवा? काय लागणार निकाल? | Lokshahi News

Vidarbha Election Poll |आता लक्ष निकालाकडे... विदर्भाचा कौल कुणाला? Devendra Fadnavis गड राखणार का?

Vidhansabha Election Poll |सत्ताधारी-विरोधक धाकधूक वाढली ; पश्चिम महाराष्ट्रात कोणाची सरशी?

Marathwada Vidhan Sabha Election Poll | महायुतीला पुन्हा जरांगे फॅक्टरचा फटका बसणार?