मुंबई, पुणे

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे आज वरळीतून उमेदवारी अर्ज भरणार; महायुतीचा वरळीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.

20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आज वरळीतून उमेदवारी अर्ज भरणार आहेत. मात्र महायुतीचा वरळीचा उमेदवार अद्याप निश्चित नाही आहे.

आदित्य ठाकरे सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार असून लोअर परळ पश्चिम येथील शिवालय सभागृहासमोरील शिवसेना शाखा क्रमांक 198 येथून आदित्य ठाकरे मिरवणुकीने वरळी इंजिनीयरिंग हब बीएमसी कार्यालयाकडे रवाना होणार आहेत.

शक्तिप्रदर्शन करत आदित्य ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी शिवसेनेचे नेते, पदाधिकारी तसेच शिवसैनिक, युवासैनिक आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

नरहरी झिरवळ यांचं शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले...

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून रोहित पवार यांच्या 'या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण

भाजपची दुसरी उमेदवार यादी आज जाहीर होण्याची शक्यता; कुणाला मिळणार संधी?

दिवाळीत उटणे लावण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहित आहेत का?