aditya thackeray vs milind deora 
मुंबई, पुणे

Aditya Thackeray यांना वरळीत मिलिंद देवरा यांचं आव्हान

वरळीत आदित्य ठाकरे यांना मनसेकडून संदीप देशपांडे आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून मिलिंद देवरा यांचे आव्हान आदित्य ठाकरे यांना असणार आहे.

Published by : Team Lokshahi

वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवेसना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे निवडणूक लढवणार आहेत. 2019 साली त्यांनी पहिल्यांदा वरळी मतदारसंघातून निवडणूक लढविली होती.

2019 साली शिवसेना-भाजप युतीमुळे ही निवडणूक आदित्य ठाकरेंसाठी तुलनेने सोपी गेली होती. त्यावेळी मनसेने त्यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता. मात्र, यावेळी वरळीत आदित्य ठाकरे यांना मनसेकडून संदीप देशपांडे आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून मिलिंद देवरा यांचे आव्हान आदित्य ठाकरे यांना असणार आहे.

मिलिंद देवरा यांनी एक्सवर पोस्ट करून उमेदवारीबाबत माहिती दिली आहे. ते या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणत आहेत की, वरळीकरांना न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला निवडणुकीला उभे राहण्याची सूचना दिली आहे. आम्ही एकत्रपणे वरळी आणि वरळीकरांना न्याय देऊ. वरळीच्या विकासाचे उद्दिष्ट काही वेळातच जाहीर करू. आता वरळीची वेळ आहे, अशा आशयाचे कॅप्शन मिलिंद देवरा यांनी लिहिले आहे.

मिलिंद देवरा यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी जानेवारी महिन्यात काँग्रेसचा हात सोडून शिवसेनेचे धनुष्यबाण हाती घेतले होते. ते दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता वाटत होती. मात्र, त्याआधीच त्यांची वर्णी राज्यसभेवर लागली.

Election Commission: राज्यात आजपर्यंत 991 उमेदवारांचे 1292 नामनिर्देशन पत्र दाखल

Rahul Gandhi नाराज? जागावाटपाबाबत काय म्हटले राहुल गांधी?

देवेंद्र फडणवीस सोडवणार मुंबईतील जागांचा पेच?

लहान मुलांचे कान टोचण्याच्या परंपरेमागील नेमक कारण काय? जाणून घ्या...

Rohit Patil VS Sanjay kaka Patil: तासगाव- कवठेमहांकाळमध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; रोहित पाटील विरुद्ध संजय काका पाटील लढत