Vidhansabha Elections  Team Lokshahi
मुंबई, पुणे

मुंबईमध्ये 36 मतदारसंघातून 420 उमेदवार रिंगणात

मुंबईमध्ये कॉंग्रेस, भाजप, ठाकरे गटाच्या काहींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. मुंबईमध्ये निवडणूक रिंगणात 420 उमेदवार उभे राहिले आहेत.

Published by : Team Lokshahi

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. मतदानाचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. सोमवारी उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. यावेळी मुंबईत कॉंग्रेस, भाजप, ठाकरे गटाच्या काहींनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. आता मुंबईमध्ये निवडणूक रिंगणात 420 उमेदवार उभे राहिले आहेत. हायप्रोफाईल लढत होत असलेल्या माहीम मतदारसंघातूर शिवसेनेच्या सदा सरवणकर यांनी आपली उमेदचारी कायम ठेवली आहे. मात्र काही मतदारसंघात बंडखोरी केल्याने चुरशीच्या लढती होणार आहेत.

लक्षवेधी लढती

वडाळा भाजपचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर हे नवव्या टर्मसाठी निवडणुकीच्या मैदानात उभे ठाकले आहेत. त्यांच्या विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव आणि मनसेच्या स्नेहल जाधव, अशी तिहेरी लढत

वरळी वरळीतून आदित्य ठाकरे दुसया टर्मसाठी उभे आहेत आदित्य ठाकरे यांना रोखण्यासाठी शिवसेनेने माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांना मैदानात उतरवले आहे. मनसेचा मुंबईतील चेहरा असलेले संदीप देशपांडदेखील मैदानात आहेत.

शिवडी हॅटट्रिकसाठी उभे असलेले शिवसेना ठाकरे गटाच्या अजय चौधरी यांच्याविरुद्ध मनसेचे बाळा नांदगावकर यांच्यात थेट लढत होणार आहे. या ठिकाणी बाळा नांदगावकर यांच्यासाठी महायुतीने आपला उमेदवार दिला नाही.

चांदिवली शिवसेनेचे (शिंदे गट) दिलीप लांडे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे नसीम खान यांच्यात दुसऱ्यांदा लढत होत आहे. गेल्या निवडणुकीत नसीम खान केवळ 409 मताने पराभूत झाले होते. या पराभवाचा वचपा काढण्याची त्यांच्याकडे संधी आहे.

धारावी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या धारावी मतदारसंघातून या वेळी खासदार वर्षा गायकवाड यांची लहान बहीण ज्योती गायकवाड यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली आहे. गायकवाड यांच्या विरोधात शिवसेनेचे राजेश खंदारे उभे ठाकले आहेत. बसपाकडून माजी नगरसेवक व व्यावसायिक मनोहर रायबागे हे रिंगणात आहेत.

मानखुर्द-शिवाजीनगर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री नवाब मलिक हे मैदानात उतरले आहेत. नवाब मलिक यांची मुख्य लढत समाजवादी पक्षाचे विद्यमान आमदार अबू आझमी यांच्यासोबत होईल. शिवसेना शिंदे गटाचे सुरेश पाटील हे मैदानात आहेत.

पूर्वीचे सरकार हप्ते घेणारे होते-मुख्यमंत्री शिंदे

विधानसभेतही 'सांगली पॅटर्न! 'जयश्री वहिनी ह्या माझ्याच उमेदवार त्यांना निवडून द्या' विशाल पाटील यांच आवाहन

Healthcare: पचनाच्या समस्यांवर घरगुती उपाय, 'हा' आहे सोपा मार्ग

Share Market Opening: देशांतर्गत शेअर बाजारात मोठ्या घसरणीसह नोव्हेंबर सिरिजची सुरुवात

Sharad Pawar यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत