विधानसभा निवडणूक 2024

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर; आता 'या' तारखेला होणार परीक्षा

Published by : Siddhi Naringrekar

निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत.

याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा लांबणीवर गेल्या असल्याची माहिती मिळत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने हिवाळी सत्रातील 19 आणि 20 नोव्हेंबरला होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

परीक्षांच्या तारखांमध्ये बदल झाला असला तरी परीक्षेची वेळ आणि परीक्षा केंद्रांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मुंबई विद्यापीठाने दिली आहे.

19 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा या 30 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला होणाऱ्या सर्व परीक्षा या 7 डिसेंबरला होणार आहेत. परीक्षांच्या सुधारित तारखा विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केल्या आहेत.

बच्चू कडू यांच्या विरोधात भाजपचा उमेदवार; बच्चू कडू म्हणाले...

वरळी विधानसभेत आदित्य ठाकरे विरुद्ध शायना एनसी? भाजपच्या शायना एन सी शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता

महायुती मनसेला बिनशर्त पाठिंबा देण्याची शक्यता; शिंदे, फडणवीस, राज ठाकरेंमध्ये पाठिंब्याबाबत चर्चा?

काँग्रेसची पहिली यादी उद्या जाहीर होण्याची शक्यता; 54 उमेदवारांची नावं निश्चित?

भाजपनंतर आज शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर होण्याची शक्यता; 50 उमेदवारांच्या नावांची घोषणा होणार?