थोडक्यात
मुंबईत यंदा 1 कोटी 2 लाखांहून अधिक मतदार
मतदान प्रक्रियेसाठी मुंबईत 60 हजार कर्मचारी तैनात
पोलीस दलातील 25 हजार 696 कर्मचारी कर्तव्यावर
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. आज 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीचे मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
मुंबईत यंदा 1 कोटी 2 लाखांहून अधिक मतदार आहेत. मुंबईत तब्बल 2 लाख 91 हजार मतदार वाढले आहेत. मतदान प्रक्रियेसाठी मुंबईत 60 हजार कर्मचारी तैनात करण्यात आले असून पोलीस दलातील 25 हजार 696 कर्मचारी कर्तव्यावर आहेत.
मुंबईत एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याची माहिती मिळत आहे. मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाल्याचे पाहायला मिळत आहे.